स्वच्छ शहरांच्या यादीत शहर पहिल्या स्थानावर
मध्यप्रदेशातील इंदोर शहर आता देशातील पहिले ‘वॉटर प्लस’ शहर घोषित करण्यात आले आहे. स्वच्छतेविषयीचा स्वतःचा दृढ संकल्प आणि समर्पणासाठी इंदोर पूर्ण शहरासाठी अनुकरणीय उदाहरण ठरले आहे. स्वच्छ सवेंक्षणासाठी आता वॉटर प्लस सर्वेक्षण देखील केले जात आहे. याकरता जुलै महिन्यात केंद्र सरकारचे एक पथक दौऱयावर होते. केंद्राच्या पथकाने 11 मापदंडांवर सर्वेक्षण सुरु केले होते. 3-4 दिवसापर्यंत चाललेल्या या सर्वेक्षणादरम्यान सुमारे 200 हून अधिक ठिकाणांची पाहणी करण्यात आली होती.
शहर स्वच्छ सर्वेक्षणाच्या विविध मापदंडांमध्ये प्रथम स्थानी आहे. याच गुणांच्या आधारावर कुठले शहर स्वच्छतेप्रकरणी कितव्या स्थानी आहे हे निश्चित होते. इंदोर मागील 4 वर्षांपासून स्वच्छतेप्रकरणी पहिल्या क्रमांकावर आहे. यंदा वॉटर प्लसमध्येही अव्वल स्थान मिळविल्याने सलग 5 व्यांदा पहिला क्रमांक मिळणार हे निश्चित झाले आहे.
नद्यांमध्ये सांडपाणी जाण्यापासून रोखल्याने इंदोरला ही कामगिरी करता आली आहे. शहरात प्रतिदिन 312 एमएलडी पाणी साफ होत आहे. शहरातील लोकांचेही यात मोठे योगदान आहे. लोकांनी स्वतःच्या घरांच्या रचनेत बदल रत नाल्यात कोसळणारे सांडपाणी स्वतःच्या खर्चावर सीव्हेज लाईनमध्ये वळविले आहे.
वॉटर प्लस दिशानिर्देशांनुसार इंदोर महापालिकेने 25 छोटय़ा-मोठय़ा नाल्यांमध्ये 1,746 सार्वजनिक आणि 5,624 घरगुती सीव्हर आउटफॉलचे टॅपिंग करत नदी-नाल्यांना सीव्हरपासून मुक्त केले होते. महापालिकेने काल्ह आणि सरस्वती नदीलाही देखील सीव्हर लाइनपासून मुक्त केले होते.
शहरात 7 सीव्हरेज ट्रीटमेंट प्रकल्प स्थापन करण्यात आले असून त्यात प्रतिदिन 110 दशलक्ष लिटर प्रक्रियाकृत पाण्याचा वापर होत आहे. दिशानिर्देशांनुसार शहरात 147 विशेष प्रकारच्या यूरिनलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच तलाव, विहिरी आणि सर्व जलस्रोतांना साफ करण्याचे काम देखील होत आहे.