प्रतिनिधी/ पणजी
ज्या कलाकारांना कलागौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांच्या खांद्यावर आता एक जबाबदारी देण्यात आली आहे की, या ज्येष्ठ कलाकारांनी आता नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करायचे आहे. ही कला जणारे जसे पडद्यावरील कलाकार महत्वाचे असतात त्याचप्रमाणे पडद्यामागील कलाकारही तेवढेच महत्वाचे असतात. पुढील वर्षात व्यासपीठावरील कलाकारांबरोबरच पडद्यामागील कलाकारांनाही पुरस्कार देणार असल्याचे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
कला व संस्कृती संचालनालय गोवा आयोजित कलागौरव पुरस्कार 2019-20 मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप, उपसंचालक अशोक परब, सदस्य सचिव चोखाराम गर्ग आणि अरुण नाईक यांची उपस्थिती होती.
मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, आज केवळ शिक्षण क्षेत्रातच आपले नाव मुले कमवत नाही तर क्रिडा आणि कला क्षेत्रातही आपले नाव कमवतात. कलाही एक शैक्षणिक पद्वी आहे. पालकांनी आपल्या मुलामध्ये कलेचे गुण ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे. कला व संस्कृती संचालनालय करत असलेले सहकार्य पुरत नाही याची आम्हाला कल्पना आहे परंतु त्यानिमित्ताने आम्ही कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करीत आहोत.
एकूण 49 कलाकारांना ‘कलागौरव पुरस्कार 2019-20’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. साहित्य गटात रविंद्र रमाकांत म्हार्दोळकर, संगीत गटात श्रीकांत फ्ढातार्पेकर, गोपाळ दामले, केशव नाईक, ब्राझ रॉड्रीगीज, गुरुदास नागेशकर आणि फ्ढातिमा पिंटो, पेंटींग गटात गोविंद पोके, विनोद नाडकर्णी, शांताराम चणेकर, गुरव फ्ढाsंडू व तेली फ्ढडते, लोककला गटात क्रिष्णनाथ नाईक, बाबूसो गावडे, निर्मला शिरगांवकर, नयना प्रियोळकर, सावळो गावडे, राम वझरीकर आणि श्रीप्रसाद शेट, तियात्र गटात जोस लुईस डीयोगो फ्ढर्नांडिस, रेजिनाल्ड नाझारेथ, ऍन्तोनी फ्ढर्नांडिस, रत्नाकार गोवेकर, डॉमिन्गोस रॉड्रीगीज, जोस वालाड्रेस, विल्लीयम फ्ढर्नांडिस आणि मेनीनो मारीया दी आरावझो, नाटय़गटात सगुण शेट शिरोडकर, संजय नागवेकर, विद्यानंद नाईक, शिवानंद गावडे, वसंती कारापुरकर, गुरुदास शेट गांवडळकर, भानुदास देसाई, हरिश्चंद्र खेडेकर, दत्ताराम आमोणकर, सुकांती नाईक, क्रिष्णनाथ मडकईकर, आत्माराम गावडे आणि सोनु पेडणेकर, भजन गटात गुरुदास गांवकर, विठु मडकईकर, अंता वेर्णेकर, रमाकांत कोमारपंत आणि महादेव अंदुर्लेकर व नृत्य गटात ललीत कुलकर्णी यां कलाकारांना 25,000 रुपये, शाल, श्रीफ्ढळ आणि मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात सांखळी दीपोत्सव समिती आयोजित त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नौका तयार करणे स्पर्धेतील विजेत्यांचेही बक्षिस देण्यात आले. यामध्ये प्रथम बक्षिस भूमिका येरेदेश्वर कला समिती माजिक वाडा पर्ये, द्वितीय बक्षिस नवयुवक संघ सावईवेरे, तृतीय ऍडमेनिया सांखळी, चौथे बक्षिस वेंचर बॉयझ पर्ये आणि पाचवे बक्षिस वेग्रेश्वर वरचावाडा डिचोली यांना मिळाले. बंदीरवाडा बॉयझ काजिवाडा विठ्ठलापूर, थर्ड आय आमोणा, श्री तळखांबेश्वर पर्य, लालबाग विठ्ठलापूर आणि युनिक्रिएटर पर्ये यांना उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.