नोएडा
वॉशिंग मशीनसह इलेक्ट्रॉनिक ग्राहकोपयोगी उपकरणांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया व्हर्लपूल इंडिया कंपनीला डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीमध्ये 44 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावता आला आहे. सदरचा निव्वळ नफा हा मागच्या तुलनेमध्ये 38 टक्क्मयांनी कमी असल्याचे सांगितले जाते. वर्षामागे सदरच्या कालावधीमध्ये कंपनीने 71 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. मागणीमध्ये झालेली घसरण आणि त्याचप्रमाणे अंतर्गत खर्च वाढल्याच्या कारणामुळे नफ्यामध्ये घट झाल्याची बाबही कंपनीने अधोरेखित केली आहे. नफा तर वाढीव कंपनीने नोंदवलाच पण दुसरीकडे महसूलातही तिमाही कंपनीची कामगिरी वरचढ राहिली आहे. सदरच्या तिमाहीमध्ये कंपनीने 1541 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या तुलनेमध्ये हा महसूल जास्त आहे. मागच्या कालावधीमध्ये 1493 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. 1498 कोटी रुपयांचा खर्च कंपनीने केला आहे.