बेंगळूर : ज्येष्ठ आयएएस अधिकारी व्ही. पोन्नराजू यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे ते आता नवनियुक्त मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे सचिव म्हणून काम करणार आहेत. तर येडियुराप्पा मुख्यमंत्री असताना त्यांचे सचिव म्हणून काम करणारे डॉ. एस. सेल्वकुमार यांची कौशल्य विकास आणि उद्यमशिलता या खात्याच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे.पोन्नराजू कर्नाटक विद्युत निगमचे व्यवस्थापक संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. पुढील आदेशापर्यंत त्यांना या पदाचाही पदभार सांभाळावा लागणार आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे आणि इतर मंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकांना त्यांच्या पदांवरून मुक्त करण्यात आले आहे.
Previous Articleभूमिपुत्र विधेयक न्यायालयात होणार रद्द
Next Article ग्राम पंचायत कर्मचारीही आता कोरोना वॉरियर्स
Related Posts
Add A Comment