प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक सरकारचे दिल्लीतील प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी सोमवारी काँग्रेसचे ज्ये÷ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कर्नाटकातील प्रलंबित योजना संदर्भात ही चर्चा झाली.
उत्तम पद्धतीने सेवा करण्यासाठी आपले सहकार्य व मार्गदर्शन असणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा शंकरगौडा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, बेंगळूर सेंट्रलचे खासदार पी. सी. मोहन यांनी नवी दिल्ली येथे शंकरगौडा यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.