- सुप्रिया सुळे यांनी मानले डॉक्टरांचे आभार !
ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मंगळवारी पोटदुखी बळावल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 31तारखेला ते रुग्णालयात दाखल होणार होते. पण, दुखणे अधिव जाणवू लागल्यामुळे एक दिवस आधीच त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्यावर मंगळवारीच शस्त्रक्रियाही करण्यात आली.

राज्याचे आरोग्य मंत्री यांनी शरद पवार यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती माध्यमांशी संवाद साधाताना दिली.
ते म्हणाले, येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, ज्याबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील. पण, तूर्तास मात्र शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

तर, शरद पवार यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांच्या चमूचे आभारही मानले.
दरम्यान, शरद पवार हे 31 तारखेला रुग्णालयात दाखल होणे अपेक्षित होते. पण, पोट दुखी वाढल्याने निर्धारित वेळेआधीच त्यांना मुंबईचील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापूर्वी रविवारी देखील त्यांना पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात नेले होते. तेथील तपासणीनंतर त्यांना 31 मार्चला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता.