बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरच्या परप्पन अग्रहरा मध्यवर्ती कारागृहात तुरूंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या दिवंगत मुख्यमंत्री आणि एआयएडीएमके प्रमुख जे. जयललिता यांच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला यांना बुधवारी ताप आल्याने बेंगळूरच्या बोअरिंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
शशिकला यांची २७ जानेवारीला सकाळी तुरूंगातून सुटका करण्यात येणार आहे. दरम्यान त्यांना ताप आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले होते. अशी माहिती परप्पन अग्रहारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदिशा एच. एल. यांनी सांगितले. दरम्यान शशिकला यांना ताप आला आहे आणि त्यांना उपचारासाठी बोअरिंग रुग्णालयात नेण्यात आले आहे. माझ्या माहितीनुसार, त्या लवकर तुरुंगात परततील असे त्या म्हणाल्या.
२७ जानेवारीला शशिकला यांची चार वर्षांच्या तुरूंगवासाची मुदत पूर्ण करेल. २७ जानेवारी रोजी पहाटेच्या वेळी त्यांची सुटका करण्यात येणार आहे, अशी माहिती तुरूंगातील अधिक्कारयांनी तिचे वकील राजा सेंथूर पांडियन यांना दिली.