25 लाखाच्या निधीची तरतूद : निर्बिजीकरणासाठी आतातरी कंत्राटदार मिळणार का?
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने प्रत्येक गल्लीमध्ये व भंगीबोळामध्ये कुत्र्यांचे घोळके दिसत आहेत. काही ठिकाणी नागरिकांच्या अंगावर धावुन जात असल्याने नागरिकांना धोकादायक बनले आहे. यामुळे भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली असल्याने कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविली आहे.
शहर आणि उपनगरातील रस्त्यावर भटकणाऱया कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव शहरवासियांना होत असल्याने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. हॉटेलमधील अन्न व टाकाऊ पदार्थ कचराकुंडीत टाकण्यात येत असल्याने भटक्मया कुंत्र्यांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मात्र निर्बिजीकरण करण्याव्यतिरिक्त महापालिका कोणत्याच उपाययोजना राबवित नाही. पण गेल्या दोन वर्षापासून निर्बिजीकरण करण्याची मोहिमदेखील बंद झाली आहे.
कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी महापालिकेने दिलेले कंत्राट 2018मध्ये संपले होते. कंत्राट वाढवून देण्याची मागणी कंत्राटदाराने केली होती. मात्र याला महापालिकेने मंजुरी दिली नाही. यामुळे नव्याने कंत्राट मागविण्यात आले होते. पण निविदा प्रक्रियेला चारवेळा थंडा प्रतिसाद मिळाला. महापालिकेने निश्चित केलेल्या दरात कंत्राट निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास तयार नसल्यामुळे महापालिकेच्यावतीने पाच वेळा निविदा मागविल्या होत्या. 25 लाखाचा निधी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
शहरात कुत्र्यांचा उपद्रव वाढला असल्याने नागरिकांना रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे. भटक्मया कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक लहान मुले जखमी झाली आहेत. पण याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीच उपाययोजना हाती घेतली नाही. यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. याची दखल घेवून निर्बिजीकरण करण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. यापूर्वी विविध कारणांमुळे निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. यामुळे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी आतातरी कंत्राटदार मिळणार का? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.