आमदार शिवेंद्रराजेंचा खासदार उदयनराजेंना टोला
प्रतिनिधी/ सातारा
शहापूरी वासियांच्या पाण्याचा प्रश्न सध्या सर्वत्र गाजत आहे. कारण या पाण्याच्या मुद्दय़ावरून पुन्हा दोन्ही राजे आक्रमक झालेले दिसत आहेत. यातच बुधवारी पत्रकारांशी बोलताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱयातील ‘नारळ फोडय़ा गँगला’ तोच नारळ देऊन घरी पाठविण्याची वेळ आली आहे, सातारा विकास आघाडीला आता लोक कंटाळले असल्याचा टोला त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगाविला.
फिरोजभाईंच्या माध्यमातून नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळय़ाप्रसंगी आयोजित कार्यक्रमा प्रसंगी पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते. याप्रसंगी अमोल माहिते, नरेंद्र पाटील, जयंद्र चव्हाण उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, सोशयल मिडीयावर काही बातम्या मी वाचल्या असून सध्या सातारामध्ये एक नारळ फोडय़ा गँग निर्माण झाल्याचे मी वाचलं जे काम मंजूर व्हायला आलेलं असत, त्याचवेळी ही गँग नारळ फोडायला सर्वात पुढं असतात. 20 वर्षापासुन शाहूपुरी नागरिकांना पाण्यापासुन वंचित ठेवलं असं हे म्हणत असल तरी मागील 20 वर्षापासुन हे मंत्री, खासदार होते, अनेक वर्षे सदरची ग्रामपंचायत ही त्यांच्याकडे होती. त्यामुळे 20 वर्षापासुन शाहूपुरी वासियांना नेमकं कोणी वंचित ठेवलं, याचा खुलासा त्यांनी करावा, असा थेट आरोप यावेळी त्यांनी खा, उदयनराजेंवर केला.

तसेच दिलीप सोपल पाणीपुरवठा मंत्री असताना त्यावेळच्या अधिवेशन काळात या योजनेला मंजूरू मिळाली, यादरम्यान आपण ही मुंबईत होतो असे सांगितले. यावेळी लोकवर्गणी रद्द झाली त्यामुळे ही शाहुपुरीची योजना मंजूर झाली. त्यानंतर काही दिवसांनी ही योजना पुन्हा अडकली होती. ज्यावेळी कासच्या योजनेला मंजुरी मिळाली त्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून मी या योजनेकरीता प्रशासकीय मान्यता घेतली. त्यामुळे सदरचा वाढीव निधी उपलब्ध झाला. यातच आता ही नारळफोडय़ा गँग निर्माण झाली आहे. निवडणूका जवळ आला असल्याने आता पुन्हा या नारळफोडय़ा गँगचे उपद्रव दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत.
हद्दवाढीचा निर्णय देखील यापूर्वीच झाला असता पण यांच्याच राजकारणामुळे आणि बुगबच्च्यांना सांभाळायचं म्हणून हा निर्णय जवळपास दोन वर्षे लांबला. मत मिळविण्यासाठी, नगरपालिका आपल्याकडे राहिली पाहिजे, स्वतःच अपयश दुसऱयावर ढकलन आणि जुने आरोप प्रत्यारोप करत बसण हे सुरूच आहे, त्यामुळे कोणीही याकडे लक्ष देऊ नये, सातारा विकास आघाडीच्या कारभाराला संपूर्ण सातारावासीय कंटाळले आहेत. नुसंत खायचं, बोगस बिल काढायची, पैसे मिळेल त्या मार्गाने खायचे हे मागील पाच वर्षापासुन नगरपालिकेत सुरू आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की, या नारळफोडय़ा गँगना त्यांचाच नारळ त्यांच्या हाती देऊन घरी पाठवायचं आहे, सातारकर हे नक्की करतील असे शिवेंद्रराजेंनी सांगितले.