प्रतिनिधी/शिराळा
राज्यात आज पासून इयत्ता पाचवी ते आठवी शाळा तब्बल दहा महिन्यानंतर सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी चांगली उपस्थिती दाखवली. दहा महिन्यानी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर, शाळा सुरू झाल्याने गेल्या काही महिन्यापासून सूनसून असलेले शिराळा बस स्थानक पुन्हा गजबजून गेले आहे.
शिराळा येथे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. त्यांना ये जा करण्यासाठी एसटी महत्त्वाची आहे.आज शाळा सुरू झाल्या 11 ते 2 या वेळेत हे वर्ग घेण्यात आले. मास्क अनिवार्य होता .पण सोशल डिस्टन्सिंग चं काय? दुपारी शाळा सुटल्यानंतर सगळे विद्यार्थी घरी जाण्यासाठी एसटी बस स्थानकाजवळ जमा झाले. आणि एकच गर्दी उसळली. अजून एस टी म्हणावी तशी फायद्यात धावत नाही. ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या कमी भारमान असल्याने बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गर्दी होणे स्वाभाविक आहे.
आज एसटीत अगदी रेचारेची करून विद्यार्थी चढत होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे इथे शक्य नाही. एकच गाडी असते आणि ती चुकली की दुसरी गाडी सुटायला दोन ते चार तासापर्यंत वाट बघावी लागते. आता शाळा तर सुरू झालेल्या आहेत .पण सर्व परिस्थिती पूर्वपदावर अजूनही आलेली नाही. एसटी हे ग्रामीण भागाच्या रक्तवाहिन्या आहेत. जर एसटी व्यवस्थित चालली तर ग्रामीण भागातील जनजीवन पूर्वपदावर येऊ शकते. पण उच्च प्राथमिक शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. आता ऐस टी सेवा वेळेत आणि पुर्ण क्षमतेने सुरू होणे गरजेचे आहे.
Trending
- मंगळवारपेठेत तब्बल सव्वाशे नळ कनेक्शन बोगस
- भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाची गांठ आज उझबेकिस्तानशी
- आजचे भविष्य शनिवार दि. 3 जून 2023
- टायटलरविरोधातील खटला एमपी-एमएलए न्यायालयात
- अॅशेसविषयी चर्चेचा ऑस्ट्रेलियावर परिणाम होणार नाही : लियॉन
- प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्षपद उदयनराजेंना
- बुथ कमिट्या सक्षम करून सरकार उलथवून टाका; राष्ट्रवादीचे निरीक्षक आमदार शशीकांत शिंदे यांचे आवाहन
- सावर्डेत भवानीच्या डोंगराला भीषण आग; अज्ञाताचे कृत्य, २० ते २५ एकर डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी !