ऑनलाईन टीम / मुंबई
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात तसेच राज्यात लॉकडाऊन नसला तरी निर्बंध अजूनही कायम आहे. मात्र या निर्बंधामध्ये काही अंशी शिथिलता देण्यात आल्याने काही प्रमाणात व्यवहार सुरु करण्यात आले आहेत. यातच महाराष्ट्र सरकारने धार्मिक स्थळे व शाळा देखील सुरु करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आजपासून राज्यात शाळेची घंटा वाजली.
जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा सुरु झाल्याने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “मला माझे शाळेतले दिवस आठवत आहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. त्यामुळे आज शाळेचे नाही तर आज आपण मुलांच्या भविष्याचं, विकासाचं, प्रगतीचं दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे असल्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
“शिक्षकांना कधीही आरोग्याबाबत शंका आली तर त्यांनी कोरोना चाचणी करणे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. ऋतू बदलत असतांना साथीचे रोग येत असतात. त्यामुळे या दरम्यान कोरोना तर आला नाही ना, याची खात्री करुन घेणे महत्वाचे आहे. तसेच सोशल डिस्टंगिंचे पालन करणे, स्वच्छता राखणे महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले. कोरोनाने आपल्याला काय शिकवलंय याचा अंदाज घेऊन पुढचं आयुष्य आरोग्यदायी व्हावं. हीच जबाबदारी सरकारची आहे. एकदा उघडलेले शाळा बंद होणार या निर्धाराने आजपासून या नवीन आयुष्याची आपण सुरवात करु”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Previous Articleकेंद्राकडून लस उपलब्ध होताच मुलांचे लसीकरण
Next Article काळचौंडी येथे साडेचार लाखांची घरफोडी
Related Posts
Add A Comment