प्रतिनिधी / शिरोळ
शासनाच्या विविध योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कटिबद्ध असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य डॉ अशोकराव माने यांनी केले. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती मार्फत शिरोळ जिल्हा परिषद मतदार संघातील अकिवाट गावांतील अंगणवाडी क्र 245 मध्ये बेबी किटचे वाटप जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ.अशोकराव माने बापू यांचे हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे हे होते अकिवाट ग्रामपंचायतीचे सरपंच विशाल चौगुले यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी ग्रा. पं. सदस्य विठ्ठल गायकवाड दानोळे मॅडम व सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स उपस्थित होत्या.
Previous Articleमिरजेत चालत्या बुलेरो गाडीने घेतला पेट
Next Article राजस्थान सीमेवर पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा
Related Posts
Add A Comment