प्रतिनिधी /बेळगाव
विनायक कॉलनी, शाहूनगर येथील योगवर्गाचा चौथा वर्धापन दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योगशिक्षक जोतिबा भादवणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ओ. एफ. गौडा यांचा चंद्रकांत खंडागळे यांनी सत्कार केला.
राचप्पा गंजी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. संगीता कोनापुरे यांचा किरण मन्नोळकर व मोहन बागेवाडी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. बाळाताई कडकभावी यांनी सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपा कोदाणपूर, रेखा जाधव, काव्या कत्ती, दीपक पानसरे, रमेश पाच्छापुरे यांनी मेहनत घेतली.