नवनाथ जाधव यांचा उपक्रम – कण्हेर आरोग्य केंद्रातर्फे लसीकरण
प्रतिनिधी/ सातारा
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जाधव यांनी कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने शाहूपुरीतील हिंदवी पब्लिक स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 300 जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. यामध्ये विशेष बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना घरी जावून लसीकरण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शिबिराच्या उदघाटन प्रसंगी हिंदवी पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी, बाळासाहेब कदम, ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन तरडे, प्रा. डॉ. संग्राम शिंदे, राजाराम शेलार, अप्पा औताडे, राजेंद्र केंडे व पप्पू बालुगडे माऊली येडे उपस्थित होते.
शासकीय आरोग्य यंत्रणा व सामान्य जनता यांच्या मधील दुवा म्हणून संयोजक व स्वयंसेवकांनी पारदर्शकपणे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. या शिबिराचे खास वैशिष्टय़ म्हणजे ज्या लोकांना वयपरत्वे किंवा दुर्धर आजारपणामुळे शिबीर स्थळी जाऊन लस घेणे शक्य नाही अशा जेष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आले. यामध्ये देशसेवेसाठी योगदान दिलेले माजी सैनिक कॅप्टन शिंगटे यांना त्यांच्या आझदनगर येथील घरी जाऊन त्यांना लसीकरण करण्यात आले.
शाहूपुरीत अशा प्रकारच्या लसीकरण शिबिराचे आयोजन करून नवनाथ जाधव यांच्या प्रयत्नातून आजपर्यंत एक हजार लोकांनी लस मिळाली आहे. कोरोना नियमांचे पालन शिबिर यशस्वी करण्यासाठी चेतन खराडे, संकेत परामने,ऐश्वर्य रजपूत, गणेश वाघमारे, ज्ञानेश्वर येडे, सुभाष महाडिक, प्रशांत शेलार, रोहित जाधव, विनोद पाटील, पंकज साळुंखे, संजय यादव व समर्थ जिमखाना मंडळाचे सर्व पदाधिकाऱयांनी परिश्रम घेतले.