प्रतिनिधी / शाहूवाडी
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शहरात सहा कोरोना रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात काही अंशी शिथिलता केली असल्याचा आदेश प्रांताधिकारी अमित माळी यांनी दिला असून त्या आदेशानुसार शहरातील व्यवहार सकाळी नऊ ते चार या वेळेतच सोशल डिस्टन्सिंगसह सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन सुरू करता येतील अशी माहिती नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी दिली.
मलकापूर शहरात सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने प्रतिबंध क्षेत्र घोषित केले होते. मात्र मलकापूर नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी प्रतिबंधित क्षेत्रात शिथिलता करावी याबाबत कोरोना आपत्ती निवारण समिती अध्यक्ष तथा तहसिलदार गुरू बिराजदार यांच्याकडे मागणी केली होती या नुसार संबंधित कोरोना रुग्ण सापडलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी शहरात सकाळी 9 ते 4 या वेळेत व्यवहार सुरळीत सुरू राहतील मात्र व्यापारी वर्गासह नागरिकांनी खबरदारी घेऊनच वावर करावा नियमाचे उल्लंघन केल्यास प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल. असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दरम्यान शहरातील बुरुड गल्ली चौक ते एचडीएफसी बँक व जुना एस टी स्टॅण्ड येथील मंगलधाम कार्यालय ते राजू वारंगे घर हा परिसर पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणूनच कायम करण्यात आला आहे.
एकूणच मलकापूर शहरातील बाजारपेठ 9 ते 4 या वेळेत सुरू राहील मात्र बाहेरून येणाऱ्या नागरिकांनीही दक्षता घेणे आवश्यक असून यात हलगर्जी अथवा दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित घटकावर कारवाई करण्यात येईल.
Previous Articleसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Next Article जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पावणेदोन कोटींवर
Related Posts
Add A Comment