वार्ताहर / शिखरशिंगणापूर :
शिखरशिंगणापूर येथील भवानी घाटातून नातेपुतेकडे जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार 400 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत माय-लेकाचा दुर्दैवी अंत झाला.
नातेपुते पोलीस यंत्रणेकडून मिळालेली माहिती अशी, मूळ थदाळे ता. माण येथील गजानन सर्जेराव वावरे (वय 53), आणि त्यांच्या मातोश्री हिराबाई सर्जेराव वावरे (83), हे काल थदाळे सहकारी सेवासोसायटी मतदानासाठी आले होते. गावी एकरात्र मुक्काम करून मंगळवारी सकाळी परतीच्या प्रवासासाठी ते निघाले होते. शिंगणापूर नजीकच्या भवानी घाटात नातेपुतेकडे जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली. घटनेची मिळताच शिंगणापूरच्या 25-30 तरुणांनी ट्रेकरच्या सहाय्याने मायलेकरांचे मृतदेह बाहेर काढले.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र नातेपुते येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.