प्रतिनिधी / सातारा
सातारा तालुक्यातील पाडळी येथे वाघर लावून सावज शोधत असताना चक्क 12 जणांना वन विभागाने अटक केली आहे. त्यामुळे सातारा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वनपरिक्षेत्र अधिकारी सातारा यांच्या कडील दि.१६ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी सातारा श्रीमती शितल राठोड व वनपरिमंडळ अधिकारी परळी योगेश गावित यांनी पाडळी (ता. सातारा) येथे एक मोठी शिकारी टोळी शिकार करत असल्याचे समजलेवरुन गुन्हेकामी दोन पथक तयार करुन घटना स्थळी घेराव घातला.१२ जणांना पकडले. आरोपी कडुन शिकारीकरिता वापलेले साहित्य १०वाघरा (लांबी ९०० मी.),लाकडी काठ्या ५०, मोटर सायकल ४, छोटा हत्ती १ असे सुमारे ४४६२०० इतके रक्कमेचे मुद्दे माल जप्त केल आहे. सदर आरोपी हे दत्तात्रय विजय पाटील (वय.३३ वर्ष रा.हरपळवाडी ता.कराड जि.सातारा), आकाश रमेश आवळे (वय.२३ वर्ष रा.अतित ता.जि.सातारा),तुषार अंकुश काळे (वय.२५ वर्ष रा.अतित ता.जि.सातारा),अमर राजकुमार काळे (वय, २५ वर्ष रा.नागठाणे ता.जि.सातारा), विशाल बबन भिंगारे वय,२३ वर्ष रा.इंदोली ता.कराड जि.सातारा), मंगेश संजय जाधव वय.२४ वर्ष रा.नागठाणे ता.जि.सातारा, सयाजी भिकु मदने (वय.३३वर्ष), वय.५० वर्ष रा.इंदोली ता.कराड जि.सातारा, श्रीमंत रामचंद्र गायकवाड वय.२५ वर्ष रा.अतित ता.जि.सातारा, चैतन सुनिल काळे वय.२२ वर्ष रा.नागठाणे ता.जि.सातारा, सोमनाथ एकनाथ काळे वय.३० वर्ष रा.नागठाणे ता.जि.सातारा, अजित श्रीरंग जाधव वय.३६ वर्ष रा.किवळ ता.कराड जि.सातारा, गणेश दादा चव्हाण (वय.२९ वर्ष रा.अतित ता.जि.सातारा) येथील रहिवासी आहेत.
वरिल सर्व आरोपी हे पाच वेगवेगळ्या गावातील असुन ते शिकारी माहीर आहेत. त्यांच्याकडे मिळालेल्या जाळ्या (वाघरी ) वरुन आज अखेर झालेल्या शिकारी कार्यवाही पेक्षा सर्वात मोठी शिकारी कार्यवाही आहे. आरोपीनी खास शिकारीसाठी ही जाळ्या बनवली असल्याचे गुन्ह्यात समोर आले आहे. आरोपी हे स्थानिक शेतकरी यांच्या शेतात वन्यप्राणी असल्याचे कळताच ते त्या शेतात चारी बाजुने जाळी लावुन शिकार करत असल्याचे समोर आले आहे. सदरचा गुन्हा हा मा.भारतसिंह हाडा उपवनसंरक्षक(प्रा.) सातारा व मा.विश्वास भडाळे सहा.वनसंरक्षक (वनी.)सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीम.शितल राठोड,वनपरिमंडळ अधिकारी परळी योगेश गावित,सुहास भोसले,वनरक्षक राज मोसलगी,महेश सोनावले,रणजित काकडे,संतोष काळे,मारुती माने यांची टिम पुढील चौकशीचे काम करत आहे.