बेळगाव : टिळकवाडी विभागीय शारिरीक शिक्षक संघटना आयोजित आनंद सोमनाचे पुरस्कृत हनुमान चषक आंतरशालेय थ्रोबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धेला शनिवारी 2 ऑक्टोबर रोजी प्रारंभ होत आहे.
सदर स्पर्धा ठळकवाडी येथील बालिका आदर्श व ठळकवाडी स्कुलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. महिला गटासाठी थ्रोबॉल स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन, कॅन्टोन्मेंट मराठी, संत मीरा अ, सेंट पॉल्स, जी. जी. चिटणीस, डीपी, संत मीरा बी, व्ही. एम. शानभाग, ब्लूमिंग बर्ड्स मुक्तांगण व केएलएस संघांनी भाग घेतला आहे. पुरूष व्हॉलीबॉल स्पर्धेत कॅन्टोन्मेंट मराठी, मराठी विद्यानिकेतन, टिळकवाडी विभाग अ, टिळकवाडी विभाग ब, कॅन्टोन्मेंट, इंग्रजी माध्यम व उत्तर विभाग या संघांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कर्ते आनंद चव्हाण, टीएफए सोसायटीचे सहसचिव आनंद गाडगीळ, एसकेई सोसायटीचे संचालक आनंद सराफ, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव उमेश कुलकर्णी, ठळकवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक राज्tढ कुडतुडकर, बालिका आदर्शचे मुख्याध्यापक एन. ओ. डोनकरी आदी उपस्थित राहणार आहेत.