अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही कर्ज देणार,पहिल्यांदाच सभा खेळीमेळीत,तब्बल पाच तास चालली सभा
प्रतिनिधी / कोल्हापूर
प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांची कर्जमर्यादा 28 वरुन 40 लाख करण्याची महत्वपूर्ण घोषणा चेअरमन आण्णासाहेब शिरगावे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱयांना कर्ज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. हॉटले मराठा रियासत येथील कॉन्फरन्स हॉल येथे दुपारी एक वाजता ही सभा झाली. बॅकेच्या इतिहासत पहिल्यांदाच खेळीमेळीच्या वातावरणात तब्बल चार तास सभेचे कामकज झाले.
सुरवातील संस्थापक राव डी. आर. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत प्रास्ताविक चेअरमन आण्णासाहेब शिरगावे यांनी केले. अहवाल वाचन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चौगले यांनी केले. सभेस व्हाईस चेरअरमन बाजीराव कांबळेसंचालक राजमोहन पाटील, बजरंग लगारे, संभाजी बापट, नामदेव रेपे, प्रशांत पोतदार, गणपती पाटील, शिवाजी पाटील, साहेब शेख, दिलीप पाटील, अरुण पाटील, प्रसाद पाटील, धोंडीराम पाटील, सुरेश कोळी, स्मिता डिग्रजे, लक्ष्मी पाटील, सुमन पोवार, संदीप पाटील, आदी उपस्थित होते.
आर्थिक वर्षात 600 कोटींचा व्यासाय -चेअरमन शियरगावे
चेअरमन शिरगावे यांनी अहवाल सालातील कामकाजाचा आढावा घेतला ते म्हणाले, दोन वर्षे कोरोनाचे सवाट असतानाही बँकेने प्रगती केली आहे. वर्षाअखेर बँकेने 604.29 कोटींचा व्यवसाय करीत 600 कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. भाग भांडवलामध्ये 169.94 लाखांनी वाढ झाली आहे. सेवानिवृत्त आणि जिल्हा बदली, मयत सभासदांमुळे भागभांडवल 57.96 लाखांनी कमी झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सीआरएआर 9 टक्के आवश्यक आहे. 31 मार्चला तो 13.93 इतका आहे, यातून बँकेची सक्षमता दिसून येते. कर्जमाफी निधीमध्येही 1287.45 लाख राखीव निधीत आहेत. सध्या बँकेकडे 33666.62 लाखांच्या ठेवी आहेत. ठेवींच्या सुरक्षिततेसाठी 43.04 इतका विमा भरलेला आहे. सभासद, कर्जदारांना बँकेकडून सुलभ सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. एसएमएस, आरटीजीएस, एटीएम, डी. आर. साईट, फास्ट टॅग, क्युआरकोड आदी सुविधा दिल्या आहेत. सेवेत असताना मयत झालेल्या सभासदांचे अहवाल सालात 79.73 लाखांचे कर्जमाफी केले आहे. सभासदांच्या विश्वासामुळे बँक प्रगतीवर असुन संचालक मंडळावर असाच विश्वाश कामय ठेवा असे आवाहन शिरगावे यांनी केले.
प्रश्न विचारण्यासाठी विरोधकांना अधिक संधी
एनेवेळच्या विषयात सभसदांनी प्रश्न विचारले, प्रश्नोत्तरात विरोधकांनाच अधिक संधी देण्यात आली. अहवालासोबत सभादांना बॅलन्स सर्टीफीकेट मिळावे, शेअर रकमेवर व्याज द्यावे, शाखानिहाय अहवाल मिळावा, अशी मागणी जगन्नथ कांबळे यांनी केली. संचालक मंडळा बैठकीत याबाबत चर्चा करु अशी ग्वाही चेअरमन शिरगावे यांनी दिली. मलकापूर शाखेत सोने तारण अपहार झाला आहे का, शिरोळ येथे पुराच्या ठिकाणी डी. आर. सेंटर कशासाठी अशी विचारणा रवी पाटील यांनी केली. शाखेच्या जागी पूर येत नाही. तर मलकापूर शाखेत कोणताही गैरव्यवहार नाही. शाखाधिकाऱयांनी घरगुती अडचणीमुळे राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले. सेवानिवृत्त चेअरमन यांची थकबाकी नाही असा खुलासाही यावेळी करण्यात आला.
विरोधकांचा बार फुसका
सभेच्या तोंडावर विरोधकांनी पत्रकबाजी करत सत्ताधाऱयांच्या विरोधात रान उठवले होते. त्यामुळे सभा वादळी होणार असा अंदाज बांधला होता. मात्र प्रत्यक्ष सभेच्या कामकाजात पाच हजार सभादांपैकी केवळ आठशे ते नऊशे सभासदांनी कामकाजात सहभाग घेतला. त्यामुळे सभागृहाबाहेर पत्रकबाजी करणार विरोधक सभेत म्युट होते. प्रत्येक ठरावावर घेतलेल्या मतदानात विरोधी बाजुने केवळ 70 ते 80 जणच मतदानात भाग घेत होते.