शिये/ प्रतिनिधी
शिये (ता.करवीर) माळवाडी येथील रविवारी रात्री मयत झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल मंगळवारी सकाळी पाॅझीटिव्ह आला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन झाली आहे. तर कोरोना बाधितांची संख्या अकरा झाली असून नऊ जण उपचार घेत आहेत.
माळवाडी येथील त्या व्यक्तिला सर्दी, ताप असल्यामुळे चार दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. अहवाल येण्यापुर्वीच त्या व्यक्तीचे निधन झाले. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने मयत व्यक्तीच्या प्रथम संपर्कातील आलेल्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.