नागरिकांतून समाधान : चालक-वाहकाचा सत्कार
प्रतिनिधी/ कागवाड
गेल्या काही वर्षापासून बेळगाव मार्गे विजापूर कडे धावणारे बसेस पैकी काही बसेस शिरगुप्पी-ऐनापुर यामार्गे सोडण्याची मागणी होती. त्या मागणीला राज्याचे परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी 3 बसेस या मार्गावरून सोडण्याचा आदेश दिल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
सोमवारी ऐनापुर येथे विजापूर येथून आलेली बसची पूजा ऐनापुर नगरपंचायतचे अध्यक्ष तम्मण्णा पारशेट्टी, के.आर.ई.एस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादागौडा पाटील, संचालक मोहन कारची, आदींनी पूजा करून चालक व वाहक यांचा सत्कार करून इतरांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
विजयपुर बस डेपो विभाग प्रमुख नारायणप्पा कुरुबर यांनी बस सोडण्याचे आदेश दिले आहेत. बेळगाव येथून सकाळी 6 वाजता सुटलेली बस, 9 वाजेपर्यंत ऐनापुर येथे येणार आहे. तेथून अथणी वाया विजापूरकडे पोहोचणार आहे.
दुसरी बस इंडी-विजापूर मार्गे बेळगावला जाणारी बस विजापूर येथून सकाळी 10 वाजता निघून ऐनापूर येथे 12:30 वाजता पोहोचणार आहे. व बेळगाव येथे दुपारी 3:30 वाजता पोहोचणार आहे. तर तीच परत येणार आहे. बस बेळगाव येथून सायंकाळी 4 वाजता निघून ऐनापुर येथे सायंकाळी 7 वाजता पोचणार आहे अशी माहिती दिली.
ऐनापुर येथे नव्या बसची पूजा करत असताना नगरपंचायत चे अध्यक्ष तम्मण्णा पारशेट्टी, उपाध्यक्ष गीता केंगार, के.आर.ई.एस. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादा पाटील, संचालक मोहन कारची, सुरेश कुडवक्कलगी, नागप्पा दोडमनी, अजीत हंचिबट्टी, शानक्का साळवी, रमेश दोडमनी, श्रीनिवास कलादगी, विठ्ठल जाधव, महादेव ऐहोळे, सह इतर उपस्थित होते.