४८ लाखाहून अधिक वसुली : तहसीलदार
शिरोळ : प्रतिनिधी
येथील शिरोळ तहसिल कार्यालय परिसरात असणाऱ्या गौण खनिज अनधिकृत 27 वाहनांची लिलाव प्रक्रिया पार पडली . या वाहन लिलाव प्रक्रियेत 159 लिलावधारकांनी सहभाग घेतला .या लिलावामध्ये एकूण 48,71,883/- इतकी गौणखनिज वसुली होत आहे. अशी माहिती तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व इचलकंजी उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली शिरोळ तहसील कार्यालयाच्याअधिकाऱ्यांनी बेकायदेशीर वाळू माती दगड वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी ताब्यात घेतल्या होत्या. त्याच्या लिलावाची बोली आज करण्यात आली.
ताब्यातील वाहन लिलाव सुरू करणेपूर्वी लिलाव लावलेल्या 10 संबंधित वाहनमालकांनी 16,22,766/- इतका आदेशानुसार संपूर्ण दंड रक्कम पूर्णपणे भरली असून 5 वाहनमालकांनी आदेशातील रक्कमेच्या 25 % प्रमाणे 7,14,117/- इतकी रक्कम चलनाने जमा केली आहे. उर्वरीत 12 वाहनांनी लिलावामध्ये उच्चतम बोली लावून 25,35,000/- इतकी रक्कमेचा लिलाव झाला आहे. दरम्यान, या लिलाव प्रक्रियेमध्ये ARTO तांत्रिक अधिकारी स्वप्निल कदम, सत्यजित पाटील याच्यासह तहसिलदार डॉ.अपर्णा मोरे-धुमाळ, नायब तहसिलदार योगेश जमदाडे, गौण खनिज महसूल सहाय्यक हजर होते.