शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील तरुणांना खेळण्यासाठी मैदानी खोली करावी , या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने निवासी नायब तहसीलदार पी जी पाटील यांना देण्यात आली. कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर गेले सात-आठ महिने झाले खेळण्यासाठी मैदान बंद करण्यात आले आहेत . कोरोनाविषाणू चा प्रभाव कमी झाला असून सध्या राज्यात विविध नोकर भरती होणार आहे . तालुक्यातील सार्वजनिक सर्व खेळाचे मैदान बंद आहे.
तसेच शाळा महाविद्यालय बंद असून या ठिकाणचे देखील मैदानी बंद करण्यात आलेत .अनेक तरुणांना मैदानावर सरावासाठी अडचणी निर्माण झाले आहेत .सध्या पोलीस भरती सैनिक भरती भरती साठी युवकांना सरावासाठी मैदान उपलब्ध होत नाही .त्यामुळे त्यांची भविष्यात नुसकान होणार आहे .तेव्हा खेळण्यासाठी व सरावासाठी मैदान उपलब्ध खुली करण्याची मागणी करण्यात आली .यावेळी तालुकाध्यक्ष सागर माने ,उपाध्यक्ष संतोष पाटील ,दिग्विजय माने ,ऋषिकेश चुडमूगे, रंणजीत राणे -संकपाळ ,रोहन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे विद्यार्थी -कार्यकर्ते उपस्थित होते.