‘एक दिवा महाराजांसाठी’ उपक्रमांतर्गत आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
श्री शिवप्रतिष्ठानतर्फे गुरुवारी शिवाजी उद्यानात दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1 हजारहून अधिक दिव्यांनी परिसर उजाळून गेला होता. ‘एक दिवा महाराजांसाठी’ या उपक्रमांतर्गत दरवषी हा उपक्रम राबविला जात आहे. पहिला दिवा महाराजांसमोर लावून शिवभक्त आपली दिवाळी साजरी करतात. दीपोत्सवासाठी गुरुवारी पहाटे शिवभक्त शिवाजी उद्यानात उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी पहिला दिवा लावून आरती केली. तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, शहर प्रमुख अजित जाधव, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, भास्कर पाटील, युवराज पाटील, हभप गोपाळ पाटील गुरुजी (कंग्राळी), नामदेव पिसे, तुकाराम पिसे, स्वप्निल, वाघवडेकर, अनंत सावंत, मंजुनाथ चव्हाण, सचिन काळे लोहार, सुशांत तारेकर, निखिल रायकर, प्रसाद बाचोळकर, सागर मास्तमर्डी, विनायक बाचीकर, एकनाथ आडाव, विनायक पालेकर, परशराम पाटील, अनंत पाटील, नागराज पाटील, ज्ञानेश्वर मंगाण्णाचे, विजय कुंटे, केतन मयेकर, प्रमोद कंग्राळकर, भास्कर पाटील, युवराज पाटील, आशुतोष कांबळे, कार्तिक, अनंत, युवराज (गणेशपूर), प्रियांका पावशे यांसह धारकरी उपस्थित होते.
बाळेकुंद्री खुर्द येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांची सुवर्णसिंहासनासाठी मदत
बाळेकुंद्री खुर्द येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवप्रभू व दुर्गामाता दौडमध्ये देणगी स्वरूपात जमलेली रक्कम, याबरोबरच माजी सैनिकांनी दिलेली रक्कम बाळेकुंद्री खुर्द येथील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रायगड येथे उभारण्यात येत असलेल्या सुवर्णसिंहासनासाठी देऊ केली आहे. जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्याकडे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी 11875 रुपये इतकी रक्कम सुपूर्द केली. याप्रसंगी शाम काणेकर, गजानन पाटील, विश्वनाथ जाधव, प्रवीण मुरारी, निलेश चंदगडकर, राहुल बेळगावकर, रूतिक पाटील, अक्षय निलजकर, संदीप बेळगावकर, विशाल पाटील, आदर्श चौगुले, बाहुबली व्हसकेरी, पवन जाधव यांसह धारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.