प्रतिनिधी/ बेळगाव
मराठीपण जपणाऱया खासबाग-वडगाव परिसरातून शुक्रवारी सातव्या दिवशीची दौड झाली. सर्वत्र करण्यात आलेले स्वागत, भगव्या पताका, महिलांनी केलेले औक्षण, शिवशंभूच्या नावाचा गजर यामुळे सर्व वातावरण शिवमय झाले होते. निर्बंध असतानाही प्रत्यक्ष सहभागी न होता धारकऱयांनी केलेले स्वागत हे शुक्रवारच्या दौडचे विशेष होते.
सातव्या दिवशीच्या दौडला खासबाग येथील दुर्गामाता मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते रवी साळुंखे व सदानंद मजुकर यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. सर्वात मोठी दौड म्हणून वडगावच्या दौडची ओळख आहे. वडगाव भागात दरवषी जल्लोषात स्वागत करण्यात येत असते. यावर्षीही त्याच उत्साहाने ठिकठिकाणी दौडचे जल्लोषी वातारणात स्वागत करण्यात आले. महिला औक्षण करण्यासाठी जागोजागी उभ्या होत्या.
बाजार गल्ली वडगावमार्गे हरि मंदिर क्रॉस, विष्णू गल्ली येथून मंगाई मंदिर येथे सांगता झाली. विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. ध्येयमंत्राने सातव्या दिवशीच्या दौडची सांगता झाली. यावेळी गोपिका बाळेकुंद्री, सुमन मुचंडी, शमिका बेळगावकर, ऋतुजा पाटील, सुनीता पावले, नीता गोजगेकर, जोत्स्ना मुचंडी यासह महिला उपस्थित होत्या.
दौडची व्याप्ती वाढतेय
भरकटलेल्या समाजाला धर्मसंस्कार मिळावेत, यासाठी भिडे गुरुजींनी 35 वर्षांपूर्वी सांगली येथे दौड सुरू केली. त्यानंतर किरण गावडे यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये दौड काढण्यात येत आहे. तरुणाईला देव, देश आणि धर्मासाठीचे शिक्षण या दुर्गामाता दौडमुळे मिळत असल्याने दौडची व्याप्ती वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगावमधील सर्वात मोठी दौड वडगावात
बेळगावमधील सर्वात मोठी दौड म्हणून वडगावची दौड ओळखली जाते. दरवर्षी 20 ते 25 हजार शिवभक्तांचा दौडमध्ये सहभाग असतो. रात्रभर या दौडची तयारी केली जाते. परंतु यावषी निर्बंध आल्यामुळे 13 ते 14 कि. मी. च्या दौडवर दोन कि. मी. ची मर्यादा आल्याचे त्यांनी सांगितले.
रविवार दि. 25 रोजीचा दौडचा मार्ग…
मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून दौडला सुरुवात होणार आहे. त्यानंतर बसवाण गल्ली, रामलिंगखिंड गल्लीमार्गे धर्मवीर संभाजी चौकात दौडची सांगता होणार आहे.