मुंबई / ऑनलाईन टीम
शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभेतील खासदार संजय राऊत आणि लोकसभेतील खासदार अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने ही नवीन यादी जाहीर झाली आहे. मुबंई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नेत्यांनाही या यादीत स्थान देण्यात आले आहे.
हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना नव्या यादीत स्थान मिळालेले नाही.
शिवसेना प्रवक्तेपदी यादीत कोण ?
संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
अरविंद सावंत – खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते
प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
अॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
सचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन वर्णी)
सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन वर्णी)
अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन वर्णी)
मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार (नवीन वर्णी)
किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)
शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) (नवीन वर्णी)
डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन वर्णी)
किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन वर्णी)
संजना घाडी (नवीन वर्णी)
आनंद दुबे (मुंबई) (नवीन वर्णी)
Previous Article२८ विद्यार्थी आणि ७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह
Next Article माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना कोरोनाची लागण
Related Posts
Add A Comment