मुंबई \ ऑनलाईन टीम
सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली. यासोबतच शिवसेनेवर, सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो म्हणून माझं निलंबन करण्यात आल्याचा आरोप देखील अतुल भातखळकर यांनी यावेळी केला.
अतुल भातखळकर म्हणाले की, तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल. धक्काबुक्की कुणीही केली नाही. शिवसेना आमदारानेच शिवीगाळ केलीय. आपण गोंधळावेळी डायसवरही गेलो नव्हतो, पण शिवसेनेवर, सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो म्हणून माझं निलंबन करण्यात आलं आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी 106 आमदारांचं निलंबन केलं तरीही आम्ही हा लढा असाच सुरुच ठेवू. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. ते सांगतील त्याप्रमाणे लढाई लढण्यात येईल. आमचं संख्याबळ कमी झालं असलं तरी अकेला देवेंद्र काफी है, अशी टीका अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
Related Posts
Add A Comment