कर्नाटक राज्य पश्चिम पदवीधर मतदारसंघ
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य पश्चिम पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सोमशेखर उग्रानी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना ही निवडणूक पहिल्यांदाच लढवित आहे. दि. 8 ऑक्टोबर रोजी धारवाड येथे निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उग्रानी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत कर्नाटक राज्य सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी व ज्येष्ठ शिवसैनिक विजय उग्रानी उपस्थित होते.