प्रतिनिधी / बेळगाव
येथील शिवछत्रपती सेवा संघ बेळगावच्यावतीने परंपरेनुसार शिवजयंती उत्सव व 14 मे 2021 तारखेप्रमाणे धर्मवीर संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे.
बेळगाव शहरात परंपरेने साजरी होणाऱया शिवजयंतीला यंदा 101 वर्षे पूर्ण होत आहेत. यावषी कोरोना संकटामुळे साध्यापद्धतीने कोविड नियमांचे पालन करून छ. श्री शिवाजी उद्यान येथे दि. 13 रोजी सकाळी 6.30 वा. शिव छत्रपतींच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर दुसरे दिवशी दि. 14 मे रोजी सकाळी 6 वा. धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती येथील ध. संभाजी महाराज चौक येथे कोविड नियमांचे पालन करून साजरी करण्यात येईल. वरील दोन्ही कार्यक्रमांस शिवशंभू भक्तांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे उत्सव मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.