प्रतिनिधी/ रत्नागिरी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी)चा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी जिह्यातून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ग्रामीणमध्ये 4 व शहरी विभागात 2 विद्यार्थी चमकले. तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातून 10 तर शहरी विभागातून रत्नागिरी जिह्यातील एकही विद्यार्थी स्थान मिळवू शकला नाही.
पाचवीमध्ये शिष्यवृत्तीr परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागातून चमकलेले विद्यार्थी : हर्षवर्धन मनोहर पाटील (93.05) जिल्हा परिषद धामणपे शाळा, श्रेयस जयवंत नायकवडे (93.05) सरस्वती विद्यामंदिर पाचल, कौस्तुभ भारत मोरे (93.05) ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, अर्चित विनायक शिंदे (92.36) ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत शहरी विभागातून चमकलेले विद्यार्थी राधेय रवींद्र धोपट (90.27) पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी आणि चिन्मय नंदकिशोर कामत (89.58) न्यू इंग्लिश स्कूल लांजा.
इयत्ता आठवी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागातून रत्नागिरी जिह्यातील 10 विद्यार्थी चमकले. यशस्वी विद्यार्थी मंथन शशांक बुटाला (93.19) ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, गंधर्व राजेंद्र भालेकर (91.15) ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, श्रेणीक श्रीकांत पाटील (89.11) ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, सानिया संदिप चव्हाण (89.11) ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, रुतुज परमानंद बेंडखळे (88.43) ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, राधिका संजय पाटील (88.43) ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, साहिल सुनिल जाधव (88.43) मिनाताई ठाकरे विद्यालय साडवली, साहिल सचिन खानविलकर (87.75) ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, विक्रम विजय पालकर (87.75) ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, दक्षिता भारत मोरे (87.75) ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकलेले 10 विद्यार्थी आणि त्यांची टक्केवारी हर्षवर्धन मनोहर पाटील (93.05), श्रेयस जयवंत नायकवडे (93.05), कौस्तुभ भारत मोरे (93.05), अचित विनायक शिंदे (92.36), अनया आनंद हिरेमठ (90.97), ओजस नितीन गुहागरकर (90.27), प्रथमेश अमोल भिडे (89.58), ऋषिकेश शांतीलाल आव्हाड (89.58), दृष्टी दीपक खांबे (89.43), चैतन्य राजेश मोहिते (88.88),
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकलेले 10 विद्यार्थी आणि त्यांची टक्केवारी मंथन शशांक बुटाला (93.19), गंधर्व राजेंद भालेकर (91.15), श्रेणीक श्रीकांत पाटील (89.11), सानिया संदिप चव्हाण (89.11), ऋतुज परमानंद बेंडखळे (88.43), राधिका संजय पाटील (88.43), साहिल सुनिल जाधव (88.43), साहिल सचिन खानविलकर (87.75), विक्रम विजय पालकर (87.75), दक्षित भारत मोरे (87.75).
16 फेबुवारी 2020 रोजी झालेल्या पाचवी आणि आठवी परीक्षेचा निकाल 9 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर 20 ऑक्टोबरपर्यंत गुण पडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागवण्यात आले होते. परिषदेकडे विहित मुदतीत ऑनलाईन आलेल्या परिपूर्ण अर्जावरुन संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी करुन गुण पडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून या परीक्षेचा अंतिम निकाल करण्यात आला. अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या गुरुवारी दुपारी परिषदेच्या www.mscepune.in या http://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत.