167 कोरोनामुक्त तर 156 जणांना बाधा
प्रतिनिधी / पणजी
राज्यात गुरुवारी कोरोना बळींचे सत्र थांबले असताना काल शुक्रवारी पुन्हा दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बळींचा आकडा 658 झाला आहे. काल 167 जणांनी कोरोनावर मात केली तर नव्याने 156 जणांना कोरोनाची बाधा झाली. सध्या राज्यात 1715 सक्रिय रूग्ण आहेत.
संशयित रुग्ण म्हणून 36 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 74 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले. आतापर्यंत 45761 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 43388 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रूग्णांची आकडेवारी पुढिलप्रमाणे : डिचोली 57, सांखळी 50, पेडणे 32, वाळपई 30, म्हापसा 85, पणजी 110, हळदोणा 16, बेतकी 37, कांदोळी 71, कासारवर्णे 12, कोलवाळ 59, खोर्ली 53, चिंबल 79, शिवोली 54, पर्वरी 87, मये 14, कुडचडे 28, काणकोण 30, मडगाव 138, वास्को 97, बाळ्ळी 29, कासावली 60, चिंचिणी 24, कुठ्ठाळी 86, कुडतरी 57, लोटली 23, मडकई 18, केपे 27, सांगे 26, शिरोडा 22, धारबांदोडा 28, फोंडा 147, नावेली 29.
13 नोव्हेंबरपर्यंतचे एकूण रूग्ण 45761
13 नोव्हेंबरपर्यंत बरे झालेले रूग्ण 43388
13 नोव्हेंबरपर्यंतचे सक्रिय रूग्ण 1715
13 नोव्हेंबर रोजीचे नवे रूग्ण 156
13 नोव्हेंबर रोजी बरे झालेले रूग्ण 167
13 नोव्हेंबर रोजीचे कोरोना बळी 2
13 नोव्हेंबरपर्यंतचे एकूण बळी 658