बेंगळूर : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत असून सक्रिय रुग्णसंख्याही वाढली आहे. मागील चोवीस तासांत राज्यात 1,587 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 869 जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, शुक्रवारी 10 बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात सध्या उपचारातील रुग्णसंख्या 12,067 इतकी आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 9,66,689 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 9,42,178 जण कोरोनामुक्त झाले. एकूण 12,425 जणांचा कोरानाने बळी गेला आहे.
Previous Articleकोरोनाविरुद्धच्या लढय़ात सहकार्य करा!
Next Article हेमंत निंबाळकर यांना दिलासा
Related Posts
Add A Comment