वार्ताहर /पालये
रायफल शूटिंग असोसिएशनने यश शूटिंग अकादमीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या तिसऱया अखिल गोवा पातळीवरील शूटिंग स्पर्धेत युवराज आळवे, आदित्य सावंत, एल्ड्रिडा फर्नांडिस, साईनेश गडेकर, अतुल नाखरे, सिद्धार्थ राऊत आणि यश पाडलोस्कर यांनी विविध गटात सुवर्णपदके मिळविली.
10 मीटर एनआर खुल्या स्पर्धेतील पुरूष, यूथ, सीनियर आणि महिला गटातील स्पर्धेचे आयोजन म्हापशात तर 25 व 50 मीटर एनआर पुरूष विभागातील स्पर्धेचे आयोजन मांदे येथे झाले. बक्षीस वितरण डॉ. स्नेहा यांच्या हस्ते आणि डॉ. जयेश राणे यांच्या उपस्थितीत झाले.
स्पर्धेचे सविस्तर निकाल याप्रमाणेः 10 एनआर ओपन साईट रायफल पुरूष सीनियर गट- युवराज आळवे (सुवर्ण), कुंदन नागवेकर (रौप्य), प्रवींद गावस (कास्य). 10 मीटर एनआर चॅम्पियनशीप पुरूष यूथ गट- आदित्य सावंत (सुवर्ण, यश आसोलकर रॉप्य), डायलन दुबे (कास्य). 10 मीटर रायफल एनआर सीनियर विभाग- आदित्य सावंत (सुवर्ण), यश आसोलकर (रौप्य), प्रशील प्रभू (कास्य).
10 मीटर एनआर चॅम्पियनशीप महिला सीनियर गट- एल्ड्रिडा फर्नांडिस (सुवर्ण), आर्यकी राठोड (रौप्य), मैत्री दास (कास्य). 10 मीटर रायफल एनआर चॅम्पियनशीप पुरूष पिस्टोल सीनियर विभाग- साईनेश गडेकर (सुवर्ण), प्रशांत पावस्कर (रौप्य), सन्मेश फडते (कास्य). 10 मीटर एअर पिस्टोल एनआर चॅम्पियनशीप महिला सीनियर विभाग- श्रीया नखाटे (सुवर्ण), विशाखा वेळुस्कर (रौप्य). 25 मीटर प्रोन सीनियर विभाग – सिद्धार्थ राऊत (सुवर्ण), अनिल सासोलकर (रौप्य), ड्रिस्लोन आल्मेदा (कास्य). 50 मीटर प्रोन सीनियर विभाग आयएसएसएफ चॅम्पियनशीप पुरूष – यशा पाडलोस्कर (सुवर्ण).