सेन्सेक्स 338 अंकांनी प्रभावीत :
वृत्तसंस्था
मुंबई
चालू आठवडय़ातील गुरुवारच्या सत्रातही सलग दुसऱया दिवशीही घसरण राहिली आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स 338 अंकांनी घसरला आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या मागील बैठकीनंतर जागतिक बाजारात चिंतेचे ढग निर्माण झाल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातील कामगिरीवर नकारात्मक राहिला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीवर आधारीत बीएसई सेन्सेक्स ट्रेडिंगदरम्यान 50,000 अंकापर्यंत पोहोचला होता. परंतु हे स्थान प्राप्त करुनही दिवसअखेर सेन्सेक्स 337.78 अंकांनी घसरुन निर्देशांक 49,564.86 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 124.10 अंकांनी घसरुन निर्देशांक 14,906.05 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील दिग्गज कंपन्यांपैकी ओएनजीसीचे समभाग 2.70 टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबत सन फार्मा, पॉवरग्रिड कॉर्प, ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, कोटक बँक आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, इंडसइंड बँक, टायटन, लार्सन ऍण्ड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह आणि इन्फोसिससह अन्य समभाग फायद्यात राहिले असून यांची तेजी ही 2.47 टक्क्यांपर्यंत राहिल्याची नोंद केली आहे.
जागतिक पातळीवरील आशियातील अन्य बाजारांमध्ये शांघाय, हाँगकाँग आणि सोल यांच्यात घसरण राहिली. तर जपानच्या निक्कीने मात्र तेजी नोंदवली आहे. युरोपमधील प्रमुख बाजारांमध्ये ट्रेडिंगमध्ये मजबूत स्थिती राहिली आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय कच्चे तेल 0.15 टक्क्यांनी मजबूत होत 66.76 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
प्रमुख घडामोडींचा प्रभाव
जागतिक पातळीवर गुरुवारी नकारात्मक कल राहिल्याने देशातील बाजारात घसरण राहिली आहे. अमेरिकेच्या बाजारामध्येही घसरण होती. फेडरल रिझर्व्हची बैठक झाल्यानंतर काही प्रमाणात तेजी राहिल्याने निर्देशांकात मजबूत स्थिती होती.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 804
- इडसइंड बँक… 975
- टायटन…….. 1531
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1409
- इन्फोसिस…. 1339
- बजाज फिनसर्व्ह 11250
- अल्ट्राटेक सिमेंट 6570
- स्टेट बँक……… 384
- बॉश………. 15838
- सिप्ला……….. 924
- एमआरएफ. 81434
- बंधन बँक……. 294
- कमिन्स………. 848
- अंबुजा सिमेंट.. 320
- कोलगेट……. 1620
- अशोक लेलँड… 125
- अरोबिंदो फार्मा 1021
समभाग घसरलेल्या कंपन्या
- ओएनजीसी…. 111
- सन फार्मा…… 686
- पॉवरग्रिड कॉर्प 228
- एचडीएफसी बँक 1435
- ऍक्सिस बँक…. 705
- भारती एअरटेल 520
- कोटक महिंद्रा 1708
- नेस्ले………. 17277
- आयसीआयसीआय 619
- चसीएल टेक. 924
- एशियन पेन्ट्स 2795
- बजाज फायनान्स 5590
- टीसीएस…… 3060
- हिंदुस्थान युनि 2344
- बजाज ऑटो.. 4090
- मारुती सुझुकी 6734
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1985
- टेक महिंद्रा….. 972
- एचडीएफसी. 2449
- आयटीसी……. 207
- एनटीपीसी….. 111
- टाटा स्टील… 1104
- हिंडाल्को…….. 386
- गेल 147