बीएसई निर्देशांक 1,172 अंकांनी तर निफ्टीत 302 अंकांची घसरण
मुंबई / वृत्तसंस्था
गेले काही दिवस सातत्याने वाढत जाणाऱया शेअर बाजार निर्देशांकात सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी हजारहून अधिक अंकांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा ‘ब्लॅक मंडे’चा अनुभव आला. सोमवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1,172 अंकांनी घसरला आहे तर निफ्टी निर्देशांकातही 302 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 2.01 टक्क्मयांची घसरण होऊन तो 57,166.74 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.73 टक्क्मयांची घसरण होऊन तो 17,173.65 पर्यंत खाली आला आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना चार लाख कोटी रुपयांचा दणका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सोमवारी सर्वच क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स चांगलेच आपटले आहेत. यामध्ये सर्वाधिक फटका हा आयटी क्षेत्राला बसला असून त्याच्या शेअर्समध्ये चार टक्क्मयांची घसरण झाली आहे. तर रिऍलिटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये एक टक्क्मयाची घसरण झाली आहे. बाजार बंद होताना ऑटो, मेटल, एफएमजीसी आणि ऊर्जा या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याचे दिसून आले.