जागतिक बँक आणि सरकारच्यावतीने प्रकल्प होणार
कृषी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या स्मार्ट प्रकल्पाचे मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण
मुंबई / प्रतिनिधी
राज्यातील कृषी व कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. तसेच या स्मार्ट प्रकल्पाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने (आयबीआरडी) सुमारे 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. यामध्ये जागतिक बँकेच्या कर्जाचा हिस्सा 1470 कोटी रुपये, राज्य सरकारचा हिस्सा 560 कोटी रुपये आणि सीएसआर मधून 70 कोटी रुपये राहील. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा कालावधी सात वर्षे इतका ठरविण्यात आला आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषि मालाच्या पणन विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येईल. यामध्ये शेतमाल बाजार प्रवेशाच्या नोंदी, प्रतवारी, गुणवत्ता तपासणी, संगणकीकृत शेतमाल लिलाव पद्धती, साठवणूक सुविधा, निर्यात सुविधा निर्मिती, अस्तित्वातील सुविधांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण तसेच कृषि उत्पन्न बाजार समित्या व खाजगी बाजार समित्यांना ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकीकृत बाजार नेटवर्कद्वारे जोडण्याची सुविधा यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक गटांची निर्मिती व त्यांच्या सक्रीय सहभागातून शेतकऱयांना बाजारपेठेशी जोडणे, शेतमालाचे काढणी पश्चात व्यवस्थापन व प्राथमिक प्रक्रियेद्वारे मूल्यवफद्धी करणे, ग्राहकांसाठी सुरक्षित खाद्य (सेफ फूड) उत्पादित करण्यास मदत करणे आणि या सर्व उपक्रमांद्वारे शेतकऱयांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांच्यासाठी उपजीविकेचे स्त्राsत निर्माण करणे आदी या प्रकल्पाचे प्रमुख उद्देश आहेत. प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ, शेतकरी उत्पादक कंपन्या, साधारण स्वारस्य गट, शेतकरी स्वारस्य गट यांची स्थापना करण्यासह त्यांचे बळकटीकरण आणि कौशल्य विकास करण्यात येईल. याअंतर्गत स्थापित संस्थांची वार्षिक उलाढाल वाढविणे व त्यांची जोडणी प्रस्थापित खाजगी व्यावसायिकांशी करण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्यात येणार आहे. शेतकरी उत्पादक संस्था, उत्पादक समूह व इतर संबंधित संस्थांचा विकास व्यापार पेंद्र म्हणून केला जाईल. तसेच विभागनिहाय बाजार सुलभता पेंद्राची स्थापना केली जाईल. प्रभावी कृषि पणन व्यवस्थेसाठी बाजार पेंद्रांशी जोडणी करण्यासह या बाजार पेंद्रात कृषि उत्पन्न बाजार समित्या, शेतकरी उत्पादक संस्था, ग्रामीण बाजार, वखार महामंडळ, खाजगी बाजार इत्यादींचा समावेश असेल. ग्रामीण बाजारांतून वितरण पेंद्रांची स्थापना केली जाणार आहे.