प्रतिनिधी / सांगली
वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्या या मागणीसाठी भारतभर रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जनसेवा फळे भाजीपाला विक्रेता संघटना भारत बंदमध्ये सहभागी होऊन विक्री बंद आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी जाहीर केले आहे.
मंगळवार आठ डिसेंबर रोजी भारत बंद असून, जिल्ह्यातील विक्रेत्यांनी भाजी खरेदी विक्री व्यवहारात उतरू नये. शेतकऱ्याला शेतमाल काढायला सांगू नये, असे आवाहन काटकर यांनी केले आहे.
देशभरातील शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात एकवटले असताना भाजीपाला विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांनीही त्यांना एक दिवस सहकार्य करावे. मंगळवार 8 रोजी कोणत्याही परिस्थितीत भाजीपाला खरेदी आणि विक्री होणार नाही. शहरात असलेले मंगळवारचे सर्व बाजार बंद ठेवले जातील. त्यामुळे शेतकरी आणि परगावच्या भाजीपाला विक्रेत्यांनीही सांगलीला येऊ नये असे आवाहन काटकर यांनी केले आहे.
Previous Articleरत्नागिरी जिल्ह्यात आज ४ नवे रुग्ण
Next Article भातपिक नुकसान 15 कोटीचे, प्राप्त 32 लाख
Related Posts
Add A Comment