पंढरीची वारी ही महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. आषाढ महिन्याची सुरुवात झाली की, सगळय़ांनाच पंढरपूरच्या वारीचे वेध लागतात. ही वारी कोरोनामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पायी वारीला खंड पडला आहे. प्रत्यक्ष वारी करणे शक्य होणार नसले तरी विठूरायांच्या भक्तांची भक्तीची ओढ जराही कमी झालेली नाही. वारी थांबली तरी भक्तीची परंपरांगत वहिवाट मात्र थांबलेली नाही त्यासाठीच भक्ती आणि मनोरंजनाचा आगळा मेळ साधत शेमारू मराठीबाणा वाहिनी भक्तांसाठी विठ्ठल भेटीचा मार्ग अधिक प्रशस्त करणार आहे. ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’, ‘वारी तुमच्या दारी’, भक्तीगीत रचना अशा तीन अनोख्या संकल्पनेतून विठूमाऊलीचे हे विशेष उपक्रम वेगवेगळय़ा माध्यमांतून रंगणार आहेत. शेमारू मराठीबाणा वाहिनीवरील कीर्तन मालिकेतंर्गत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन रंगणार आहे. ह.भ.प. उत्तम महाराज बडे, ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प. सौ. संगीताताई येनपुरे चोपडे, ह.भ.प. नेहाताई भोसले साळेकर, ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्राrजी आदिची कीर्तनं 4 जुलैपासून दररोज सायं. 6 वा. सादर होतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता पुष्कराज चिरपुटकर करणार आहे.
Previous Articleराज्यपाल बदलले, मुख्यमंत्रीही बदलणार का?
Next Article सर्वात उंच घोडय़ाचे निधन
Related Posts
Add A Comment