प्रतिनिधी/ सातारा
सातारा विकास आघाडी दिलेली वचने पूर्ण करते. बाकीच्यांचे मला माहिती नाही. पण सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जे काम हाती घेतले जाते ते तडीस लावले जाते. यादोगोपाळ पेठेतील कै.श्री.छ.प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज उद्यान पूर्णत्वास नेणारच असा शब्द खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिला.दरम्यान, साविआच्या वचननाम्यातील उद्यानाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे यांनी दिली.
शहरातील विविध विकास कामाच्या पाहणी दरम्यान त्यांनी यादोगोपाळ पेठेतल्या कै.श्री. छ. प्रतापसिंह महाराजउर्फ दादा महाराज उद्यानास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सौ.माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, पाणी पुरवठा सभापती यदुनाथ नारकर, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, माजी उपनगराध्यक्ष सॉ.दीपाली गोडसे, ऍड. डी. जी.बनकर,राजू गोडसे, अभियंता शिंदे यांच्यासह पेठेतील नागरिक उपस्थित होते.
यावेळी दीपाली गोडसे म्हणाल्या, 2008 साली सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून खासदार उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली यादोगोपाळ पेठेतून निवडणूक लढण्याची संधी मिळाली. व त्यात उदयनराजेंच्यामुळे विजयी मिळाला. श्री.छ.प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज उद्यान विकसीत करण्यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन घेतला. तसेच त्या कामांचे टेंडर सुद्धा काढले. श्रेय घेण्याचा कोणीही प्रयत्न करु नये. तसेच या उपक्रमासाठी मुस्लिम बांधवांनी केलेल्या सहकार्यासाठी त्यांचेही आभार दीपाली गोडसे यांनी मानले.