शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 2 वर : बाजारपेठ बंद : पुन्हा सीलडाऊनची अंमल बजावणी कडक :
जिल्हय़ात कोरोनाबाधितांचा आकडा 55 वर : अधिकारीवर्गाकडून खबरदारीसाठी योजना
प्रतिनिधी / संकेश्वर
16 एप्रिल रोजी येथे तबलिग कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती. सदर व्यक्तीच्या बारा वर्षीय पुतण्यालाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल बुधवारी आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. येथील रुग्णसंख्या दोन झाली असून जिल्हय़ात कोरोनाबाधितांचा आकडा 55 झाला आहे. दरम्यान याची दखल घेत कोरोनाबाधित परिसरात अधिकाऱयांनी धाव घेत योग्य त्या उपाययोजना हाती घेत बंदोबस्त कडक करताना खुली करण्यात आलेली बाजारपेठ पुन्हा बंद करण्यात आली आहे. तसेच सीलडाऊनची अंमलबजावणी पुन्हा एकदा कडक करण्यात आली आहे.
कोरोना रुग्ण आढळल्यानंतर गत 15 दिवसांपासून सीलडाऊनची अंमलबजावणी शहरात कडेकाटे करण्यात आली. यानंतर अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यास प्रारंभ करण्यात आले होते. तर यानंतर सकाळी 8 ते 12 पर्यंत किराणा दुकोन सुरू करताना नागरिकांना दिलासा देण्यात आला. यात बदल करताना किराणा दुकानांना सकाळी 7 ते 11 पर्यंत मुभा देण्यात आली.
कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यता आले होते. याबरोबरच होतक्वारंटाईनही करण्यात आले होते. याबरोबरच बाधिताच्या कुटुंबातील 11 जणांनाही क्वारंटाईन करताना त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल एक-दोन दिवसात मिळण्याची शक्यता असतानाच कोरोनाबाधिताच्या पुतण्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने पुन्हा शहरात खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांची आशा कार्यकर्त्यांसह आरोग्य विभागाकडून सर्व्हे करण्यात आला आहे. संशयितांना क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅबही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
तिघांना केले क्वारंटाईन
दरम्यान मंगळवारी रात्री मंगळवारी कोरोनाची लक्षणे आढळल्याने सदर कोरोनाबाधित मुलाला रात्रीच बेळगाव येथे हलविण्यात आले. याबरोबरच परिसरात खबरदारी घेण्यात आली. बाधित मुलाला बेळगाव जिल्हा रुग्णालयातील कोरोना विभागात दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी सदर मुलाच्या कुटुंबातील तिघांना येथील गणेश क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याठिकाणी बंदोबस्त ठेवताना त्यांची तपासणी करण्यात येत आहे.
अधिकाऱयांचीधावपळ, परिसरातपाहणी
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नगरपरिषदेने अग्निशमन दलाच्या सहाय्याने निडसोशी रोडच्या दुतर्फा व बाधित परिसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. तसेच खबरदारी घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रांताधिकारी अशोक तेली, तहसीलदार अशोक गुराणी, पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जगदिश ईटी यांनी बाधित परिसराला भेट देऊन या भागातील सर्व नागरिकांना घराबाहेर पडू नका, सुरक्षित रहा, असे आवाहन केले.
मोबाईल क्लीनिक बसची सोय
बुधवारी शहरात दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने मोबाईल क्लिनीक बसची सोय करण्यात आली. सदर बसच्या माध्यमातून घरोघरी भेट देऊन आरोग्य कर्मचाऱयांच्या सहाय्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. सीलडाऊनमुळे शासकीय इस्पितळात इतर रुंग्णाना सेवा देणे अशक्य असल्यामुळे या क्लीनीक बसमार्फत रुंग्णाच्या आरोग्याची काळजी घरोघरी जाऊन घेणे शक्य होणार आहे. या बसमध्ये वैद्याधिकाऱयासह औषध आणि उपचाराची सोय केली आहे. नागरिकांनीही मोबाईल आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उदयकुमार कुडची यांनी केले आहे.
बाजारपेठ पुन्हा ठप्प होणार
सीलडाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळविण्यात गैरसोय होत होती. त्यामुळे या गैरसोयीतून तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने गेल्या दोन दिवसापासून सकाळी 8 ते 12 यावेळत बाजारपेठ खुली करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यात बदल करताना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सोय केली होती. मात्र मंगळवारी मध्यरात्रीच दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने पुन्हा बाजारपेठ ठप्प राहणार आहे.