प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील गावांमध्ये जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या कोरोनाबाधितक्षेत्राला ग्रामस्थ, ग्रामपंचायत तसेच व्यापारी यांनी विरोध केला असून कोणत्या निकषावर आता कोरोनाबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले ते सांगण्यात यावे याबाबत ग्रामपंचायती, व्यापारी आणि ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असून कोरोनाबाधित क्षेत्र त्वरित हटविण्यात यावे अशी मागणीही करण्यात येणार आहे.
कोरोनाबाधितक्षेत्रावरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात झालेल्या व्यापारी आणि ग्रामस्थाच्या बैठकीत व्यापारी आणि ग्रामपंचायत सरपंच ,सदस्य यांनी कोरोनाबाधितश्रेत्राला विरोध करत कोणत्या निकषावर कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केले त्याची मागणी सरपंच आणि व्यापारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे सांगितले याविषयी उपविभागीय अधिकारी वाघमारे आणि पोलीस निरीक्षक उदय झावरे यांना सरपंच आणि व्यापाऱ्यानी कोणत्या निकषावर कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केले ते विचारत नाराजी व्यक्त केली.
माभळे, धामणी गावात आता एकही रुग्ण नाही तसेच नावडी तसेच इतर गावातून कोरोना रुग्ण संख्या कमी आहे त्यामुळे आता कोरोना बाधितक्षेत्र घोषित करण्यामधून काय साधणार असे विचारत विरोध दर्शविला याबैठकीला नावडी सरपंच विवेक शेरे, माभळे सरपंच घडशी , व्यापारी अनिल भिडे रिंकू कोळवणकर , बाळकृष्ण काष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.