शहापूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद
प्रतिनिधी /बेळगाव
ऐन दिवाळीत चोऱया, घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे. गणेश कॉलनी-संभाजीनगर, वडगाव येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी 2 लाखांचे दागिने पळविले आहेत. रविवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
वर्षा विजय पाटील यांच्या घरात चोरीचा प्रकार घडला आहे. आपल्या घराला कुलूप लावून सणानिमित्त वर्षा सांगली येथील आपल्या बहिणीकडे गेल्या होत्या. शनिवारी त्या गावी गेल्या. रविवारी सकाळी गावावरुन घरी परतल्या. त्यावेळी दर्शनी दरवाजा उघडा होता. कडीकोयंडा तोडल्याचे दिसून आले. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला. शहापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. चोरटय़ांनी कपाटातील साडेपाच तोळय़ाचे दागिने पळविल्याचे उघडकीस आले आहे. ऐन दिवाळीत सुरू असलेल्या चोऱया, घरफोडय़ांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत.