रविवारी 1100 जण झाले कोरोनामुक्त, 258 नवे रुग्ण, 9 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोना महामारीचा फैलाव कमी होत चालला आहे. खासकरून प्रशासनाने ग्रामीण भागात लॉकडाऊन अधिक कडक केल्यामुळे रुग्णसंख्या घटत चालली असून सक्रिय रुग्णसंख्येतही मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. रविवारी 258 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1100 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण बाधितांची संख्या 73 हजार 401 वर पोहोचली आहे. शनिवारी 2 हजारहून अधिक जण बरे झाले होते. रविवारी कोरोनामुक्त झालेल्या 1100 जणांना घरी पाठविण्यात आले असून आतापर्यंत 66 हजार 900 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या महिन्यात सक्रिय रुग्णसंख्येने 18 हजारचा आकडा पार केला होता. रविवारी सायंकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सध्या 5 हजार 802 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव तालुक्मयातील 3, गोकाक, चिकोडी तालुक्मयातील प्रत्येकी 2, बैलहोंगल, रायबाग तालुक्मयातील प्रत्येकी 1 असे 9 जण दगावले असून मृतांचा आकडा 699 वर पोहोचला आहे.
आतापर्यंत 8 लाख 17 हजार 039 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 97 हजार 409 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप 1712 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. बेळगाव, चिकोडी, रायबाग, गोकाक तालुक्मयात रुग्णसंख्या वाढत असून रविवारी बेळगाव तालुक्मयातील 85 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
राजहंसगड, गणेशपूर, अष्टे, विजयनगर, के. के. कोप्प, बाळेकुंद्री खुर्द, मुचंडी, मुतगा, नागराळ, कंग्राळी बी. के., हुंचेनहट्टी, सांबरा, सुळगा, होनियाळ, शहापूर, आदर्शनगर वडगाव, अनगोळ, अशोकनगर, भडकल गल्ली, भाग्यनगर, आझादनगर, आझमनगर, चिदंबरनगर, हिंदवाडी, खासबाग, कणबर्गी, कपिलेश्वर कॉलनी, सदाशिवनगर, सैनिकनगर, संभाजीनगर वडगाव, शेट्टी गल्ली, शिवाजीनगर, टिळकवाडी, उज्ज्वलनगर, वैभवनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
अपार्टमेंटमध्ये जास्तीत जास्त स्वॅब तपासणीचा निर्णय
आगरकर रोड, टिळकवाडी येथील एकाच अपार्टमेंटमधील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तो परिसर सीलडाऊन केला असून कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून व्यापक खबरदारी घेण्यात येत आहे. त्याच अपार्टमेंटमधील 25 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासंबंधी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांच्याशी संपर्क साधला असता एखाद्या अपार्टमेंटमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास अपार्टमेंटमधील बहुतेकांची स्वॅब तपासणी करावी लागणार आहे. कारण लिफ्ट, जिना, रेलिंग, पॅसेज, पार्किंग आदी बाबी तेथे सामायिक असतात. त्यामुळे अपार्टमेंटमध्ये फैलाव वाढण्याचा धोका असतो. म्हणून अपार्टमेंटमधील सगळय़ांची मनधरणी करून त्यांची स्वॅब तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गाफील राहाल तर पुन्हा रुग्ण वाढणार
आरोग्य विभागातील वरिष्ट अधिकाऱयांनी नागरिकांना इशारा दिला आहे. सध्या रुग्णसंख्येत घट होत चालली आहे म्हणून गाफील राहाल तर पावसाळय़ात पुन्हा रुग्ण वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत तरी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे.