दिल्ली/प्रतिनिधी
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. कृषी कायद्यांच्या मुद्यावरुन झालेल्या गोंधळात विरोधी पक्षांच्या राज्यसभेच्या १२ खासदारांना निलंबन करण्यात आलं. यावेळी विरोधी पक्षाने मोदी सरकारचा निषेध करत निदर्शने सुरु केली. विरोधकांनी निलंबन रद्द करावा यामागणीसाठी सभागृहाच्या परिसरातील महत्मा गांधींच्या पुतळ्याजवळ बसून आंदोलन केलं. त्यानंतर आता आज थेट सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी विरोधकांच्या विरोधात आंदोलन केलं.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: सर्व खासदारांना वेळ वाया न घालवता संसदेचं कामकाज योग्य पद्धतीनं करावं, विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत असं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर कृषी कायदे रद्द करण्याचं विधेयक कोणतीही चर्चा न करता रद्द करण्यात आलं होतं. यावेळी विरोधकांनी यावर चर्चा करण्याची मागणी केली होती. पण सभागृहात कोणतीही चर्चा न करता हे विधेयक रद्द करण्यात आले. त्यामळे सभागृहात गोंधळाला सुरूवात झाली. गोंधळाचं हे सत्र अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी देखील सुरू आहे. त्यातच आज विरोधी पक्षांचा विरोध करण्यासाठी थेट सत्ताधारी खासदारांनीच आंदोल नकेले. विरोधक बेशिस्त वागत असल्याचा आरोप करत आज सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आंदोलन केलं.
