मुंबई / ऑनलाईन टीम
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत अधिकऱ्यांच्या बदल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप तकलादू असल्याचे सांगितले. यासोबतच सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षाचा थयथयाट सुरू असल्याचे म्हणत त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, रश्मी शुक्ला यांच्या अहवालातील अस्थापना मंडळाच्या बदल्या या संमतीने झाल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोप तकलादू होता आणि लवंगी फटाक्यासारखा होता हे सिद्ध झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपींग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर २०१९ रोजी ज्या वेळी विधानसभा निवडणूकीचे निकाल लागले त्यानंतर रश्मी शुक्ला या अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या, या अपक्ष आमदारांना भाजपसोबत जाण्यासाठी सांगत होत्या. याबाबत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही या प्रकरणाला दुजोरा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना रश्मी शुक्ला यांनी भाजपला पाठिंबा देण्यास सांगितले होते. याबाबत यड्रावकर यांनी मला कल्पना दिली होती. यानंतर ही माहिती शरद पवार यांनाही बैठकीदरम्यना मी कळवली असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदारांना भाजपला पाठिंबा देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे आमिष दाखवले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगतिले आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, अपक्ष आमदारांचे सीडीआर रिपोर्ट जप्त करुन रश्मी शुक्ला यांच्याविरोधात कारवाई करणे गरजेचे असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, सत्ता गेल्यामुळे फडणवीसांनी जो थयथयाट सुरु केलाय तो थांबवायला पाहिजे. कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही यावर बैठक घेतली यातून महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी जनतेची माफी मागावी त्यांनी जनतेचा अपमान केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काल क्रिकेट खेळत होते त्यानंतर त्यांनी वक्तव्य केले की, लूज बॉल आला की मी सीमेपार टोलावतो परंतु एकही बॉल ते सीमेपार टोलवू शकले नाही. एक बॉल उडवला तोही झेलबाद झाला असता. देवेंद्र फडणवीस यांची फलंदाजी पाहिली परंतु ते काही उत्तम खेळू शकले नाही. असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
Previous Articleकोविड सेंटरच्या शाळा चालकांना पालिकेचा ‘झटका’ ?
Next Article गोकुळ निवडणूक : माजी आमदार सत्यजित आबांची घरवापसी
Related Posts
Add A Comment