जोयडा दलित संघर्ष समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी/ जोयडा
न्यायाधीश ए. जे. सदाशिव यांनी अनुसूचित जातीच्या विकासासाठी दलित संघर्ष समिती (चंद्रकांत काद्रोळी ग्रुप)चे राज्य अध्यक्ष चंद्रकांत कादोळी यांच्या नेतृत्वाखाली तहशीलदार संजय कांबळे यांच्याद्वारे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पाठविण्यात आले.
दलित संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष चंद्रकांत काद्रोळी व जिल्हा अध्यक्ष गिरीश एस. एन. यांच्या नेतृत्वाखाली धारवाड ते उळवी देवस्थानपर्यंत पदयात्रा आयोजित केली होती. जोयडा येथे दलित संघर्ष समिती यांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी दलित संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष चंद्रकांत काद्रोळी म्हणाले, अनुसूचित जातीमध्ये अनेक उपजाती आहेत. या नागरिकांना मिळणाऱया सोयी-सुविधा मिळण्यात अडचणी आहेत. शैक्षणिक व अर्थिक मागासलेपण सर्वात जास्त आहे. या समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी न्यायमूर्ती ए. जे. सदाशिव यांनी सादर केलेला अहवालाला मान्यता देऊन मंजुरीसाठी केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी जोयडा तालुका दलित संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक कांबळे, अशोक दोड्डमनी, धारवाड जिल्हा दलित संघर्ष समिती अध्यक्ष व्यंकटेश सगबाल, चंद्रकांत नाडगेर, अनिल कांबळे व इतर 100 हून अधिक दलित नागरिक उपस्थित होते.