प्रतिनिधी / बेळगाव
सन्मती शिक्षण सहकारी कॉलेजची विद्यार्थिनी अरफा सय्यद हिने राणी चन्नम्मा विद्यापीठाने घेतलेल्या एम.कॉम. परीक्षेत विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. याच कॉलेजची विद्यार्थिनी भव्या सी. जे. हिने विद्यापीठाने घेतलेल्या बीबीए परीक्षेमध्ये सहावा क्रमांक मिळविला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन जगदीश सवदत्ती यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.