सेक्सेक्स 199 अंकानी वधारलाः रिलायन्सच्या समभागात 3 टक्क्मयांची तेजी
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील शेवटच्या सत्रात शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीची समभाग तेजी आणि जागतिक पातळीवरील निर्माण झालेल्या सरकारात्मक वातावरणामुळे मुंबई शेअर बाजरातील सेक्सेक्स 199 अंकानी वधारला आहे. तर दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्सने 645.13 अंकाचा उच्चांक गाठला होता. यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्मवर जगातील तिसऱया मोठय़ा तंत्रज्ञान कंपनीने गुंतवणूक केली असून यांचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर पडल्याचे शेअर बाजारातील अभ्यासकांनी म्हटले आहे.
दिवसभरातील व्यवहारानंतर सेन्सेक्स 199.32 अंकानी वधारुन निर्देशांक 31,642.70 वर बंद झाला आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 52.45 अंकानी वधारुन निर्देशांक 9,251.50 बंद झाला आहे.
बीएसई सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग सर्वाधिक 4 टक्क्मयांनी नफ्यात होते. अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले, टेक महिंद्रा आणि सन फार्माचे समभाग वधारले आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांचे मोठे योगदान राहिले आहे. रिलायन्स समभाग वधारलण्यासाठी अमेरिकेतील खासगी कंपनी विस्टा इक्विटी पार्टनर्सयांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 2.32 टक्क्मयांची हिस्सेदारी 11,367 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. याचाही मोठा प्रभाव बाजारावर राहिला आहे.
दुसरीकडे एनटीपीसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, ऍक्सिस बँक आणि इंडसइंड बँक यांचे समभाग मात्र घसरले आहेत. जागतिक शेअर बाजारांमध्ये चीन हाँगकाँग, दक्षिण कोरिया, जपानमधील शेअर बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले आहे. कोविड 19चा प्रभाव हा जगासोब देशातही दिवसागणित वाढत आहे. यामुळे गुंतवणूकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.