प्रतिनिधी/ पणजी
विधानसभा सभपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली आहे. उमेदवारीसाठी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्या नावाची शिफ्ढारस केली जात आहे. काँग्रेस, गोवा फ्ढाŸरवर्ड, आप आणि आर.जी. पक्ष एकवटले असून या चार पक्षांचा सिक्वेरा यांना पाठिंबा असणार आहे. मगोला मंत्रिमंडळात संधी न दिल्यास मगोही त्यांच्यात सहभागी होणार असल्याचे काँगेस गोटातून सांगण्यात आले.
आलेक्स सिक्वेरा हे वरिष्ठ आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी वीजमंत्री म्हणून काम पाहिले आहे. विरोधीगटाच्यावतीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. उपसभापतीपदी माजी उपसभापती मायकल लोबो रिंगणात उतरणार आहेत, असे बोलले जात आहे.
सत्ताधारी गटाच्यावतीने रमेश तवडकर यांच्याकडे सभापतीपदाची जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे. तर उपसभापतीपदावर अजून विचार चालू आहे. भाजपाच्यावतीने उपसभापतीपदाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच विरोधी पक्षांचा उमेदवार जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विजय सरदेसाई गैरहजर
विरोधीपक्ष आमदारांची संयुक्त बैठक माजी विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यांच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी झाली. त्यात काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, आप आणि आर.जी.च्या आमदारांचा समावेश होता. गोवा फ्ढाŸरवर्डचे आमदार विजय सरदेसाई गैरहजर राहिले. अपक्ष आणि मगोच्या आमदारांनाही निमंत्रण दिले होते पण त्यापैकी कोणी उपस्थित नव्हते.
विरोधी गटाचा निर्णय आपल्याला मान्य ः सरदेसाई
या संदर्भात आमदार विजय सरदेसाई यांच्याशी रात्री उशिरा संपर्क साधला असता ते म्हणाले, की पूर्वनियोजित काम असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. याची कल्पना आपण आमदार †िदगंबर कामत यांना दिली होती. आपल्या फ्ढार्मचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांची टीम शनिवारी येणार असल्याचे यापूर्वीच ठरले होते. फ्ढार्म हे आपले उदरनिर्वाहाचे स्रोत असून त्याकडे दुर्लक्ष होवून चालणार नाही. विरोधी गटाने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असेल, अशी कल्पना आपण यापूर्वीच दिली होती, असे सरदेसाई यांनी सांगितले.