ब्रिटनमधील ऍस्ट्राझेनिका कंपनीनी आपली लस 70 टक्के प्रभावी असल्याचे प्रतिपादन केल्यानंतर या कंपनीच्या समभागांच्या किमतीची 4 टक्के घसरण झाली आहे. जगात इतरत्र अनेक कंपन्या कोरोना लस तयार करण्याच्या कामात गुंतल्या असून काही कंपन्यांनी लस 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रभावी असल्याचे सांगितले आहे. त्या तुलनेत ऍस्ट्राझेनिका कमी प्रभावी दिसत असल्याने तिला फारशी बाजारपेठ मिळणार नाही, अशी गुंतवणूकदारांची समजूत झाल्याने त्यांनी समभाग विकल्याने किंमत कमी झाली असल्याचे मत आहे.